मुलाकडे गेलेल्या महिलेच्या घरात चोरी

बातमी शेअर करा...

मुलाकडे गेलेल्या महिलेच्या घरात चोरी

पिंप्राळा हुडको परिसरात मध्यरात्रीची घटना; १५ हजारांची रोकड लंपास

जळगाव – शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात मध्यरात्री चोरट्यांनी घरफोडी करून १५ हजारांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली. शेजारी राहणाऱ्या मुलाकडे गेलेल्या कल्पना अशोक सपकाळे (वय ४५, रा. १२० खोल्या, पिंप्राळा हुडको) यांच्या अनुपस्थितीची संधी साधत चोरट्यांनी हा डल्ला मारला. या प्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

गुरुवारी रात्री सुमारास सपकाळे या मुलाकडे गेल्यानंतर त्यांचे घर बंद असल्याची माहिती चोरट्यांनी मिळवली. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडत आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटाचे कुलूप तोडून त्यातील १५ हजार रुपयांची रोकड चोरुन नेली.

सकाळी सुमारे सहा वाजता कल्पना सपकाळे घरी परतल्या असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ विनोद सुर्यवंशी करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम