मुलाचा आई-वडिलांवर प्राणघातक हल्ला

बातमी शेअर करा...

मुलाचा आई-वडिलांवर प्राणघातक हल्ला

गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न; चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा

चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील हिरापूर गावात दारूच्या नशेत असलेल्या मुलाने आपल्या वृद्ध आई-वडिलांवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना शनिवार, दि. २० डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी घडली. या प्रकारामुळे गावात खळबळ उडाली असून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक येथे वास्तव्यास असलेला हेमंत लहू काळे हा दारू पिऊन एका अनोळखी इसमासोबत आई कमलबाई लहू काळे (वय ७०) यांच्या हिरापूर येथील घरी आला. घरात शिरताच त्याने वाद घालण्यास सुरुवात करत फिर्यादीच्या पतीवर रॉकेल टाकून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर घरातील खुर्ची व हातातील काठीने मारहाण करत गंभीर दुखापत केली. भांडण शांत करण्यासाठी पती पुढे येताच आरोपीने त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

यावेळी “तू मेलीस पाहिजे” असे म्हणत आरोपीने आई कमलबाई काळे यांचा गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला. आरडाओरड ऐकून फिर्यादीच्या भावाचा मुलगा गणेश नारायण मराठे व सत्यभामा दगा मराठे हे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून फिर्यादी व तिच्या पतीस आरोपी व अनोळखी इसमाच्या तावडीतून सोडविले.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कमलबाई काळे यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या तक्रारीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक राहुल राजपूत पुढील तपास करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम