मुलींची शालेय फी ची पावती मिळत नसल्याने : खिरोदा येथे पालकाचे आमरण उपोषण
धनाजी नाना विद्यालयात शालेय फी मध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा
मुलींची शालेय फी ची पावती मिळत नसल्याने : खिरोदा येथे पालकाचे आमरण उपोषण
धनाजी नाना विद्यालयात शालेय फी मध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा
सावदा l प्रतिनिधी
गेल्या दोन महिन्या पासून धनाजी नाना विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, खिरोदा येथिल प्रशांत सुरेश तायडे यांचे दोघे मुलींची शाळेत फी भरली असून शाळेतील मुलींची शालेय फी ची पावती देत नसल्याने
पालक प्रशांत तायडे यांना आमरण उपोषण सुरु केले आहे. होणाऱ्या परिणामास मुख्याध्यापक व संस्था चालक जबाबदार राहातील असा ईशारा पालकांनी दिला आहे.
धनाजी नाना विद्यालयात शालेय फी मध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा
प्रशांत तायडे यांच्या दोन्ही मुली धनाजी नाना विद्यालयातील शाळेत इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंत शिकत असून प्रत्येक वर्षी शालेय फी भरलेली आहे.
तरी आजपर्यंत मुलींची शालेय फी ची कुठल्याही प्रकारची पावती मिळालेली नाही. या संदर्भात तायडे यांनी शाळेकडे जून २०२४ पासून आपल्याला तोंडी स्वरूपात पावतीची मागणी केली.
पण संस्था चालक व मुख्याध्यापक जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे.
दि.२२ जुलै रोजी लिखीत स्वरूपात पावतीची मागणी केली. नंतर दि. ३० जुलै, दि. ३१ ऑगष्ट व दि. १ ऑक्टोबर अशी प्रत्येक वेळेला आपल्याला स्मरणपत्र देऊन स्मरण करून दिले.
परंतु आपण माझ्या अर्जाचा कुठल्याही प्रकारे न विचार करता पुर्तता केलेली नाही. म्हणून मी आपणास दि.१ ऑक्टोबर रोजीच्या स्मरणपत्रातच आपल्याला सांगितले आहे.
मी आपल्या शाळेच्या समोर मी भरलेल्या शालेय फी च्या पावत्या जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषणास बसेल. त्यासंदर्भात मी आपल्याला पुन्हा सांगू इच्छितो की,
येत्या दि. १५ ऑक्टोबर मंगळवार पासून आपल्या शाळेच्या समोर आमरण उपोषणाला बसत आहे. तरी पुढील होणाऱ्या परिणामास मुख्याध्यापिका, व संस्था चालक जबाबदार राहतील.
हे ही वाचा 👇
कृतज्ञता सोहळ्यात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या भव्य सत्कार
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम