मुलींच्या कराटे प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप

केशव स्मृती प्रतिष्ठान, रोटरी सेंट्रलतर्फे आयोजन

बातमी शेअर करा...

मुलींच्या कराटे प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप
केशव स्मृती प्रतिष्ठान, रोटरी सेंट्रलतर्फे आयोजन
जळगाव I प्रतिनिधी

येथील केशव स्मृती सेवा समूहाच्या सेवा वस्ती विभाग आणि रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित मुलींसाठी स्वसंरक्षण कराटे प्रशिक्षण कार्यशाळेचा नुकताच समारोप करण्यात आला.

हरी विठ्ठल नगर परिसरातील जिजामाता माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर झालेल्या समारोपप्रसंगी जिजामाता विद्यालयाचे चेअरमन डी.एल.महाले, सेवा वस्ती प्रकल्प प्रमुख डॉ.विवेक जोशी, सहप्रमुख मनीषा खडके, रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष दिनेश थोरात, मानद सचिव समर्थसिंग पाटील, माधुरी थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.

सेवा वस्ती विभागातील १०० विद्यार्थिनींना प्रशिक्षक निलेश सोनवणे, पूजा सोनवणे यांनी प्रशिक्षण दिले. त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार तर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना माधुरी थोरात यांच्या सहकार्याने प्रमाणपत्राचे देखील मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
रोटरी सेंट्रल आणि केशव स्मृतीच्या माध्यमातून मुलींना स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण उपलब्ध करून दिल्याने, त्या कणखर बनतील व संघर्षाची वेळ आल्यास त्या प्रतिकार करू शकतात. त्यामुळे या प्रशिक्षणाचा उपयोग निश्चित होईल, असे जिजामाता विद्यालयाचे चेअरमन महाले यांनी बोलताना मत व्यक्त केले. मनीषा खडके यांनीही मार्गदर्शन केले.

यावेळी प्रशिक्षण घेतलेल्या भाग्यश्री मराठे, खुशी मिस्तरी, गायत्री पाटील, साईना तडवी, श्रद्धा आहिरे या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक दिनेश थोरात यांनी तर सूत्रसंचालन रवीना भगत यांनी केले. आभार मंगला हिरे यांनी मानले.

कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र खोरखडे, किशोर पाटील, आशा पाटील, संजय खैरनार, कृष्णा महाले, संगीता पाटील, दिनेश सोनवणे, विकास तायडे, संजय पाटील, प्रशांत मडके, जगदीश शिंपी यांची उपस्थिती होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम