मुलींना शंभर टक्के मोफत शिक्षण योजनेसाठी आता नोडल अधिकारी

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश*

बातमी शेअर करा...

मुलींना शंभर टक्के मोफत शिक्षण योजनेसाठी आता नोडल अधिकारी

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश*

जळगाव : विद्यार्थिनींसाठी राज्य शासनाने लागू केलेल्या शंभर टक्के शिक्षण व परीक्षा शुल्क सवलतीच्या योजनेमध्ये संस्थाकडून फी साठी दबाव येत असल्यास जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयाला विभागीय शिक्षण सहसंचालक यांनी आता नोडल ऑफिसर नियुक्त केले असल्याचे जाहीर केल्याने विद्यार्थिनींची शुल्कासाठी अडवणूक होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे,यामुळे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

याबाबतचा शासन निर्णय असूनही विद्यार्थिनींची शुल्कासाठी अडवणूक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात १८ जुलै,रोजी जळगाव विभागीय उपसंचालक कपिल सिंघेल यांना राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कु.भाग्यश्री विवेक ठाकरे यांच्या नेतृत्वात विद्यार्थिनींना प्रवेश व परीक्षा शुल्क माफिचा म्हणजेच मोफत शिक्षणाचा लाभ होण्यासाठी लेखी निवेदन देत केलेल्या उपाययोजनेबाबत संघटनेला अवगत करावे म्हणून साकडे घातले होते.

उच्च शिक्षण विभागाने यासाठी सर्व महाविद्यालयांना विद्यार्थिनींकडून कोणत्याही प्रकारे शुल्क आकारण्यात येऊ नये आणि यापूर्वी शुल्क घेतले असल्यास ते तातडीने परत करण्याचे सक्त निर्देश दिले आहेत.याची तंतोतंत कार्यवाही व्हावी म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयात असे एकूण ४३ नोडल अधिकारी नियुक्त करून त्यांची यादी व थेट मोबाईल क्रमांक जाहीर केले आहेत.राष्ट्रवादी युवती काँग्रेसला शिक्षण विभागाने एका पत्रान्वये कळविण्यात आले असून योजनेच्या पारदर्शक अंमलबजावणीसाठी सर्व महाविद्यालयांनी आपापल्या संकेतस्थळावर,नोटीस बोर्डवर तसेच विद्यार्थिनींमध्ये जनजागृती करणे बंधनकारक करण्यात आले असून शुल्क आकारणीसंबंधी कोणतीही तक्रार थेट सहसंचालक कार्यालयाकडे करावी असे निर्देश सर्व नियुक्त नोडल अधिकारी यांना देण्यात असल्याचे या पत्रात म्हटले आहे.उच्च शिक्षण विभागाने याबाबत कार्यवाही केल्याने राष्ट्रवादी युवती काँग्रेसने समाधान व्यक्त केले आहे.

❝ मुलींना उच्च शिक्षणाचा मोफत लाभ मिळावा हा महायुती सरकारचा अत्यंत क्रांतीकारी निर्णय आहे त्यामुळे निकषपात्र प्रत्येक विद्यार्थिनीपर्यंत ही योजना पोहोचवण्यासाठी सातत्यपूर्ण जनजागृती हे आमच्या संघटनेचे कर्तव्य आहे.जिल्ह्यातील काही संस्था आता डेव्हलपमेंट शुल्काच्या नावावर अडवणूक करीत असल्याने तक्रार आल्यास आमची कायम सजग व न्यायासाठी आक्रमक भूमिका राहणार आहे.❞ 

भाग्यश्री वि. ठाकरे
जिल्हाध्यक्ष,
राष्ट्रवादी युवती काँग्रेस
(रावेर लोकसभा विभाग )

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम