मु. जे महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

रांगोळी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा आणि बहुपर्यायी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन

बातमी शेअर करा...

मु. जे महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
रांगोळी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा आणि बहुपर्यायी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन
जळगाव प्रतिनिधी

मुळजी जेठा महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून “निसर्ग आणि विज्ञानासह सर्वांगीण विकास” हा विषय केंद्रस्थानी ठेऊन आंतर महाविद्यालयीन प्रतियोगिताचे आयोजन करण्यात आले होते .त्यात प्रामुख्याने रांगोळी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा आणि बहुपर्यायी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सर्व स्पर्धा मिळून एकूण ४५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमासाठी मु. जे. महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य प्रा. संजय भारंबे सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले,कार्यक्रमाचे अध्यक्षपद डॉ. भूषण कविमंडन सर, अधिष्ठाता, विज्ञान विद्याशाखा, मु जे महाविद्यालय यांनी भूषविले तर कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून के.सी.इ.सोसायटी च्या पदव्युत्तर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. किशोर महाजन सरांची उपस्थिती होती, मंचावर डॉ प्रतिभा निकम, विभागप्रमुख, इलेक्ट्रॉनिक्स विभाग, डॉ. कविता पाटील, विभागप्रमुख,भौतिकशास्त्र विभाग तसेच विभागातील सर्व शिक्षकांची उपस्थिती होती. तसेच रांगोळी आणि पोस्टर स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून डॉ वंदना शिंदे, क.ब.चौ.उ.म.वि., जळगाव यांनी काम पहिले.

उदघाटनाचे सूत्रसंचालन नेहा जैन तर समारोपाचे सूत्रसंचालन हिरल पटेल या विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ प्रतिभा निकम यांनी मांडले तर आभार प्रदर्शन डॉ प्रेमजीत जाधव सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. भावना मानकर मॅडम, सौ सोनाली शर्मा मॅडम, डॉ. विशाल भारूड सर, तसेच विभागातील सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी काम पहिले. रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक हिरल पटेल आणि हर्षित मिश्रा (मु जे महाविद्यालय जळगाव), द्वितीय क्रमांक नम्रता पाटील आणि अंजली देवरे (D .N .C .V .P .S . चे शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय, जळगाव), तर तृतीय क्रमांक हेमांगी पाटील (मु जे महाविद्यालय जळगाव) यांनी पटकावला ,

पोस्टर स्पर्धेत प्रथम क्रमांक,द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक अनुक्रमे हितेश पाटील, हिरल पटेल आणि हर्षित मिश्रा (मु जे महाविद्यालय जळगाव) या विद्यार्थ्यांनी पटकावला, तर प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक,द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक अनुक्रमे परिमल चौधरी, हितेश पाटील, हिरल पटेल (मु जे महाविद्यालय जळगाव) या विद्यार्थ्यांनी पटकावला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम