मूल्यशिक्षणातून घडतील समाजाभिमुख नागरिक

बातमी शेअर करा...

मूल्यशिक्षणातून घडतील समाजाभिमुख नागरिक

जयेश माळी यांचे प्रतिपादन : मूल्यवर्धन उपक्रमाची सुरूवात

जळगाव – मूल्यशिक्षणामुळे विद्यार्थी फक्त अभ्यासातच नव्हे तर आयुष्यात चांगले माणूस म्हणून घडतात. यातून त्यांना प्रामाणिकपणा, जबाबदारी, मदतशीलता आणि संवेदनशीलता या गुणांची जडणघडण होते. मूल्यशिक्षण हे विद्यार्थ्यांना केवळ ज्ञान न देता त्यांना सद्गुणी, सजग आणि समाजाभिमुख नागरिक बनवणारे शिक्षण असल्याचे प्रतिपादन शांतिलाल मुथा फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक जयेश माळी यांनी केले.

महाराष्ट्र शासन व शांतिलाल मुथा फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मूल्यवर्धन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यानिमित्ताने जळगाव तालुक्यातील कंडारी जिल्हा परिषद शाळेत जयेश माळी यांनी शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी जळगाव तालुका समन्वयक गणेश कोळी उपस्थित होते. मूल्यवर्धन उपक्रमांतर्गत राज्यस्तरावर, त्यानंतर जिल्हास्तरावर प्रशिक्षण पार पडले. लवकरच केंद्रस्तरावर प्रशिक्षण होणार आहे. शाळांमध्ये मूल्यवर्धन उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने जयेश माळी व गणेश कोळी यांनी विद्यार्थ्यांसह शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी मूल्यवर्धन उपक्रमाच्या जिल्हास्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक मंजुषा पाठक, ज्योती वाघ, सुनंदा रोझदकर, सविता निंभोरे, राजाराम पाटील, विनोद जयकर, गणेश तांबे, डॉ. जगदीश पाटील आदी उपस्थित होते.

उपयुक्त मूल्यवर्धन उपक्रम – गणेश कोळी

मूल्यशिक्षणामुळे लोकशाहीतील मूलभूत तत्त्वे विद्यार्थी लहानपणापासून अंगीकारतात. स्वतःची, कुटुंबाची, शाळेची आणि समाजाची जबाबदारी ते ओळखतात. सर्वांशी प्रेमळ, नम्र व आदराने वागण्याची सवय लागते. मूल्यशिक्षणामुळे जीवन कौशल्ये विकसित होतात. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना उपयुक्त होईल असा मूल्यवर्धन उपक्रम असल्याचे जळगाव तालुका समन्वयक गणेश कोळी यांनी सांगितले.

शांतता संकेतातून वर्गनियमन – मंजुषा पाठक

राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार मूल्यशिक्षणाच्या अपेक्षांना सुसंगत अशी मूल्यवर्धन कार्यक्रमाची सुधारित आवृत्ती पहिली ते आठवीसाठी विकसित करण्यात आली आहे. त्यात वर्गनियमन, स्व-जाणीव, वैयक्तिक जबाबदाऱ्या, नातेसंबंध, सामाजिक जबाबदाऱ्या अशा महत्त्वपूर्ण विषयांचे पाच विभाग करण्यात आले आहे. वर्गनियमन विभागात शांतता संकेत दिला जाणार आहे. इतर चार विभागांमध्ये विविध उपविषय देण्यात आले आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम