मूळजी जेठा महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शन

वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम

बातमी शेअर करा...

मूळजी जेठा महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शन

वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम

जळगाव I प्रतिनिधी

वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत मूळजी जेठा महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठ अभ्यास केंद्राच्या वतीने महाविद्यालयाच्या ज्ञानरंजन ग्रंथालयात दिनांक 9 ते 11 जानेवारी,2025 दरम्यान ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले होते. सदर ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य सं.ना भारंबे यांनी केले.

त्यावेळी ग्रंथपाल डॉ. व्ही.एस. कंची आणि अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. जुगलकिशोर दुबे व सहाय्यक प्रवीण बारी यांच्यासह महाविद्यालयाच्या विविध विद्याशाखांचे अनेक विद्यार्थी उपस्थित होते. सलग तीन दिवस चाललेल्या या ग्रंथ प्रदर्शनासह या उपक्रमातून विद्यार्थ्यांना विविध विषयासंबंधीची प्रसिद्ध पुस्तके वाचनाकरिता उपलब्ध होती अनेक विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेत या पुस्तकांचे वाचन केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम