![](https://ebatmidar.com/wp-content/uploads/2025/01/WhatsApp-Image-2025-01-10-at-11.12.11-AM-scaled.jpeg)
मूळजी जेठा महाविद्यालयात विविध स्पर्धा उत्साहात
ऑनलाइन शेअर बाजार, बिझनेस आयडिया, प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि पॉवरपॉइंट सादरीकरण
ऑनलाइन शेअर बाजार, बिझनेस आयडिया, प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि पॉवरपॉइंट सादरीकरण
जळगाव (प्रतिनिधि ) ;- खानदेश कॉलेज एजुकेशन सोसायटी संचालित मूळजी जेठा महाविद्यालयात वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेत दरवर्षी राष्ट्रीय स्तरावरील MAESTRO हि स्पर्धा घेण्यात आली . यामध्ये ऑनलाइन शेअर बाजार, बिझनेस आयडिया, प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि पॉवरपॉइंट सादरीकरण या चार प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एन.भारंबे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. के.सी.ई.संचालित बी.एड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक राणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या उपप्राचार्य प्रा.सुरेखा पालवे, विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.सीए. ए.एन.आरसिवाला, स्पर्धेचे संयोजक प्रा.डॉ.संगीता पाटील आणि सहसंयोजक डॉ.नितीन चौधरी उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगतात डॉ.एस.एन.भारंबे यांनी आलेल्या स्पर्धकांना उद्योग विश्वात स्वस्थान निर्माण करण्यासाठी त्यांनी काय मेहनत घेतली पाहिजे यासंदर्भात मार्गदर्शन केले. प्रा. अशोक राणे यांनी आपल्या मनोगतात वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रात त्यांना अगणित संधी आहेत त्यांनी त्यांचे सोने करून घ्यावे या उद्देशाने संबोधिले. या स्पर्धेत एम.जे.महाविद्यालय, नाईक महाविद्यालय रावेर, एस एस एम एम महाविद्यालय पाचोरा, विद्यावर्धिनी महाविद्यालय धुळे, गोदावरी महाविद्यालय जळगाव, वर्षा पाटील महिला महाविद्यालय जळगाव, डी.एन.सी.वी.पी.जळगाव, प्रताप महाविद्यालय अमळनेर, एस.एस.बी.टी. महाविद्यालय जळगाव, के.सी.ई.आय.एम.आर. महाविद्यालय जळगाव ईत्यादी महाविद्यालयातून एकूण १३० विद्यार्थ्यानी सहभाग नोंदिविला होता. या स्पर्धेच्या समारोप प्रसंगी किरण मसाले समूहाच्या किरण वनकर प्रसिद्ध महिला उद्योजिका प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना त्या म्हणाल्या, नोकरी मागण्या ऐवजी नोकरी कशी देता येईल असा विचार आजच्या विद्यार्थ्यांनी करावा.10 पेक्षा अधिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची तयारी ठेवा.
या स्पर्धेसाठी डॉ.संदीप जोशी, डॉ.निशांत घुगे, डॉ. योगेश पुरी आणि डॉ. नीलिमा वारके यांनी परीक्षक म्हणून काम पहिले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
ऑनलाइन शेअर बाजार: प्रथम- मुजीनीद खैराद्दिन शेख विद्यावर्धिनी महाविद्यालय धुळे
द्वितीय – देवेश नितीन वाणी, अदिती योगेश गाडे एम.जे.कॉलेज जळगाव
तृतीय – कल्पेश दिलीप चव्हाण, सिद्धेश दत्तात्रय बावस्कर गोदावरी महाविद्यालय जळगाव
बिझनेस आयडिया : प्रथम – शुभम एकनाथ चव्हाण, प्रसन्ना अनिल कुलकर्णी, पूर्वा प्रशांत बडगुजर, रोषण नंदकिशोर पाटील एम.जे.कॉलेज जळगाव
द्वितीय – चेतन महाजन, प्रगती पाटील, प्रियांका बारी एम.जे.कॉलेज जळगाव
तृतीय – आदित्य वानखेडे, प्रीतिका परमार एम.जे.कॉलेज जळगाव
प्रश्नमंजुषा स्पर्धा:
प्रथम – रोहन मंधान, जयेश तनेजा, गायत्री चंद्रात्रे विद्यावर्धिनी महाविद्यालय धुळे
द्वितीय – इलीयास अब्बासअली बोहरी, महेश धन्नाराम प्रजापती एम जे कॉलेज जळगाव
तृतीय – जागृती मुकेश चौधरी, वैष्णवी सुनील पाटील, अक्षता राजेंद्र नावरकर प्रताप महाविद्यालय अंमळनेर
पॉवरपॉइंट सादरीकरण
प्रथम – प्रियांका बारी, प्रगती पाटील एम.जे.कॉलेज जळगाव
द्वितीय – खुशबू जैन प्रताप महाविद्यालय अमळनेर
तृतीय – प्राची पटेल, दिव्या सिंग एम.जे.कॉलेज जळगाव
![Jain advt](https://ebatmidar.com/wp-content/uploads/2022/08/IMG_1987.jpg)
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम