
मूळजी जेठा महविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन-२०२५ ची चैतन्यमय सुरुवात
विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग
मूळजी जेठा महविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन-२०२५ ची चैतन्यमय सुरुवात
विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग
जळगाव प्रतिनिधी
मूळजी जेठा महविद्यालयामध्ये आज १७ जानेवारी रोजी चैतन्य- २०२५ वार्षिक स्नेहसंमेलनाची मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन सकाळी १०.०० वाजता के.सी.ई.सोसायटीच्या व्यवस्थापन मंडळ सदस्या डॉ.शिल्पा बेंडाळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सं.ना.भारंबे, स्नेहसंमेलन प्रमुख डॉ.भूपेंद्र केसूर, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ.के.जी.खडके, कला शाखेचे उपप्राचार्य प्रा.देवेंद्र इंगळे, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या प्रा.सुरेखा पालवे, महाविद्यालयाचे कुलसचिव डॉ.जयदीप बोरसे, सोबतच डॉ.भूषण कविमंडन, डॉ.देवांनंद सोनार, डॉ. अब्दुल कादिर आरसीवाला आणि अन्य प्राध्यापक मंडळी उपस्थित होते.
या चैतन्य-२०२५ मध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यामध्ये महाविद्यालायातील गायन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुख्य रंगमंचावर मूल्जियंस गायक-भाग- १ या स्पर्धेचा आरंभ झाला, ज्यात एकूण १२ स्पर्धक निवडले गेले, आणि त्यांची अंतिम फेरी १८ तारखेला सकाळी घेण्यात येईल आणि त्यातून एकच मूल्जियंस गायक ठरणार आहे. या समितीचे प्रमुख म्हणून डॉ.लक्ष्मण वाघ यांनी पाहिले. तसेच हास्य प्रधान खेळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, ज्यात एकूण १२ प्रकारचे खेळ घेतले गेले आणि ९० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या समितीचे प्रमुख डॉ.नासिकेत सूर्यवंशी हे होते. त्याचप्रमाणे ज्ञानरंजन ग्रंथालयात सुमारे १८० विद्यार्थ्यांनी विविध छंद आणि ललित कला या स्पर्धेत चित्रकला, मेहंदी, केशभूषा, रेखाचित्रे, केक व फूड सजावट, क्राफ्ट, हस्तकला, मातीकला, रांगोळी, थाळी सजावट, ३ डी जोडणी कला अशा विविध प्रकारच्या कलांचे सादरीकरण केले. या समितीचे प्रमुख म्हणून प्रा.भावना मानेकर यांनी काम पाहिले. मुख्य इमारती समोरच्या बागेत फूड फेस्टिव्हल आयोजित करण्यात आले ज्यामध्ये सुमारे १५० विद्यार्थ्यांनी वेगवगेळ्या खाद्य संस्कृतीमधील खाद्य पदार्थ बनवून त्यांचे स्टॉल उभारले होते. त्यामध्ये झुनैना वाघ आणि ग्रुपला प्रथम क्रमांक, मेघा इंगळे आणि ग्रुपला द्वितीय क्रमांक आणि निखील राणा आणि ग्रुपला तृतीय क्रमांक प्रदान करण्यात आले.
या कमिटीचे काम डॉ.प्रतिभा निकम ह्यांनी पाहिले. ओल्ड कॉन्फरन्स हॉल मध्ये काव्यवाचन, कथाकथन, उत्स्फूर्त भाषण आणि गंमत जम्मत कवितेतून ह्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या, ज्यामध्ये सुमारे ६० स्पर्धकांनी सहभाग घेतला. या समितीचे काम डॉ.विलास धनवे यांनी सांभाळले. तसेच त्याच ठिकाणी प्रश्नमंजुषा स्पर्धा सुद्धा यशस्वीपणे पार पडली, जिचे काम डॉ.ओंकार साळुंखे यांनी पाहिले. या संमेलनात मुख्य रंगमंचावर विनोदी आणि प्रबोधनपर एकांकिका ही झाल्यात ज्याचे काम डॉ.राजीव पवार यांनी पाहिले. आजच्या तसेच मुख्य रंगमंचावर अंताक्षरी स्पर्धा घेण्यात आली ज्यात सुमारे ३० विद्यार्थी सहभागी झालेत. यात अरमान मलिक, मोहम्मद अजीज, उदित नारायण ह्या गटातील स्पर्धकांनी बाजी मारली. या अंताक्षरी समितीचे प्रमुखपद डॉ.गायत्री खडके यांच्याकडे होते. त्यासोबत दुपारच्या वेळी एकल, समूह आणि युगल नृत्य स्पर्धा मोठ्या जल्लोषात पार पडली. ज्यामध्ये ३६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या समितीच्या प्रमुख डॉ.भाग्यश्री भलवतकर ह्या होत्या. या स्नेह संमेलनानिमित्त महाविद्यालयाच्या मुख्य आवारात रेडक्रॉस रक्तपेढीकडून रक्तदान शिबित घेण्यात आले. यात एकूण ७८ विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. या शिबिराचे यशस्वी संयोजन प्रा.राजेश सगरगीळे यांनी केले.
उद्या दि.१८ जानेवारी रोजी महाविद्यालयात सकाळी मूल्जीयंस गायक-भाग २, विविध मनोरंजन कार्यक्रम(ऑर्केष्ट्रा) आणि दुपारी पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात येणार आहेत. यावेळी महाविद्यालयातील २०२४-२५ वर्षातील बेस्ट स्टूडंट आणि प्राचार्य घोषित विद्याशाखा निहाय ४ प्रिन्सिपल रोल ऑफ ऑनर्स हे पारितोषिके, मागील परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी आणि एन.सी.सी. व क्रीडा विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अशी माहिती प्राचार्य डॉ.सं.ना.भारंबे, स्नेहसंमेलन प्रमुख डॉ.भूपेंद्र केसुर यांनी दिली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम