मू.जे.महाविद्यालयात १७-१८ जानेवारीला रंगणार चैतन्य- २०२५ वार्षिक स्नेहसंमेलन
क्रिकेट, बॅटमिंटन, बुद्धिबळ स्पर्धांचे उद्घाटन
मू.जे.महाविद्यालयात १७-१८ जानेवारीला रंगणार चैतन्य- २०२५ वार्षिक स्नेहसंमेलन
क्रिकेट, बॅटमिंटन, बुद्धिबळ स्पर्धांचे उद्घाटन
जळगाव I प्रतिनिधी
मू.जे.महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांच्या उत्कट सादरीकरणाचा उत्सव असलेले चैतन्य-२०२५ वार्षिक स्नेहसंमेलन दि.१७ आणि १८ जानेवारी २०२५ ला आयोजित करण्यात आले आहे. या मध्ये सुरुवातीला विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी घेतल्या जाणाऱ्या क्रिकेट स्पर्धा, बॅटमिंटन स्पर्धा, बुद्धिबळ स्पर्धा ह्या एकलव्य क्रीडा संकुलाच्या वतीने सुरु करण्यात आल्या. दि.११ जानेवारी रोजी या क्रीड़ा स्पर्धांचे उद्घाटन या स्नेहसंमेलनाचे चेअरमन डॉ.भूपेंद्र केसूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य महोदय, उप-प्राचार्य आणि अधिष्ठाता उपस्थित होते.
मू.जे.महाविद्यालयाच्या चैतन्य -२०२५ मध्ये दि. १५ आणि १६ जानेवारी रोजी विद्यार्थी विविध प्रकारच्या थीमवर आधारित वेशभूषा करणार आहेत.त्यांचे परिक्षण तज्ञ परीक्षक करतील. त्याच प्रमाणे या स्नेहसंमेलनामध्ये दि.१७ आणि १८ जानेवारी या दोन दिवसात मूल्जीयंस गायक स्पर्धा , ऑर्केस्ट्रा, एकल आणि समूह नृत्य स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, हास्यप्रधान खेळ, अंताक्षरी स्पर्धा, प्रश्नमंजुषा, विविध छंद आणि ललित कला स्पर्धा, इंस्टॉलेशन स्पर्धा, काव्य वाचन, कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा आणि गंमत-जम्मत कवितेतून, फूड फेस्टिवल अशा अनेक प्रकारच्या स्पर्धांमध्ये महाविद्यालयाचे आपल्या अंगभूत कला-गुणांचे सादरीकरण करणार आहेत. त्याच प्रमाणे मागील वर्षी विविध विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह गौरव करण्यात येणार आहे. सोबतच शैक्षणिक वर्ष २०२४ -२०२५ मधील महाविद्यालयाचा बेस्ट स्टुडंट आणि विद्या शाखानिहाय ४ प्रिन्सिपल रोल ऑफ ऑनर्स विद्यार्थ्यांचा ही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. या स्नेहसंमेलनाच्या यशस्वी आयोजन-नियोजनासाठी एकूण २१ समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सं.ना.भारंबे आणि वार्षिक स्नेहसंमेलन प्रमुख डॉ.भूपेंद्र केसूर यांनी दिली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम