
मेहरुण तलावात बुडून प्रौढाचा मृत्यू
मेहरुण तलावात बुडून प्रौढाचा मृत्यू
जळगाव प्रतिनिधी शहरातील मेहरुण तलावात बुडून रामेश्वर कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका प्रौढाचा मृत्यू झाल्याचीदुर्दैवी घटना शुक्रवारी (दि. ७ नोव्हेंबर) दुपारी तीनच्या सुमारास उघडकीस आली. प्रकाश राजकमल कांबळे (वय ४८) असे मृत प्रौढाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मजुरी करून उपजीविका करणारे प्रकाश कांबळे हे शुक्रवारी दुपारी घराबाहेर पडले होते. काही वेळानंतर स्थानिक नागरिकांना मेहरुण तलावाच्या पाण्यात एका व्यक्तीचा मृतदेह तरंगताना दिसला. नागरिकांनी तात्काळ या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक पट्टीच्या पोहणाऱ्यांच्या मदतीने प्रकाश कांबळे यांचा मृतदेह तलावातून बाहेर काढला. मृतदेह बाहेर काढून तो तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर रामेश्वर कॉलनी परिसरात आणि मेहरुण तलाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. प्रकाश कांबळे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि विवाहित मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेची एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम