
मेहरूण तलाव येथे यंदा उत्सव समितीकडून रावण दहन सोहळा
मेहरूण तलाव येथे यंदा उत्सव समितीकडून रावण दहन सोहळा
जळगाव : सर्व पक्षीय नेत्यांची समिती गठीत करण्यात आली असून या रावण दहन उत्सव समितीकडून हा सोहळा पार पडणार आहे.
सर्वपक्षीय नेत्यांची समिती गठीत करण्यात आली असून या समितीचे अध्यक्ष विष्णु भंगाळे उपाध्यक्ष नितीन लढा सचिव सरिता माळी, सुनिल महाजन, सिमा सुरेश भोळे, कैलास सोनवणे, आशुतोष चुडामण पाटील, कुंदन काळे, अॅड. दिलीप पोकळे, प्रविण कोल्हे, सुनिल खडके, केतकी पाटील, संजय पवार, शरद तायडे, प्रताप पाटील, गणेश सोनवणे, अनिल अडकमोल, अॅड. सुनील पाटील यांच्या समितीकडून हा सोहळा साजरा करण्यात येणार आहे.
आज गुरूवार दि. २ ऑक्टोबर रोजी सायं. ६ वाजता मेहरूण तलाव परिसरातील लंका नगरी येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाचे उद्घाटन व रावण दहन सोहळा मंत्री गिरीश महाजन तसेच पालमंत्री गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश भोळे, आमदार, जळगाव शहर हे राहणार आहेत. जळगावकरांनी कुटुंबासह उपस्थित राहून या पारंपरिक सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन रावण दहन उत्सव समितीने केले आहे

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम