मॉडर्न इंग्लिश स्कूल, रावेर शाळेचा दहावीचा शंभर टक्के निकाल

बातमी शेअर करा...

रावेर प्रतिनिधी

मॉडर्न एज्यूकेशन सोसायटी संचलित मॉडर्न इंग्लिश स्कूल, रावेर या शाळेने सतत १९ वर्षापासून इयत्ता दहावीच्या परिक्षेच्या निकालाची शंभर टक्के यशाची उज्जवल परंपरा कायम ठेवत यावर्षीही या शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे . यावर्षी एकुण ८५ विद्यार्थ्यापैकी ७६ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. शाळेतुन ** प्रथम क्रमांकाने संदाली नितिन पाटील ९५.२०% , द्वितीय क्रमांकाने वेदांत विनोद महाजन ९४.२० % तसेच तृतीय क्रमांकाने समीक्षा अरुण मोरे व नंदीनी सचिन महाजन यांना ९३.८०% या गुणांनी उत्तीर्ण झाले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थचे अध्यक्ष हरिष गणवानी सर, उपाध्यक्ष काशीनाथ महाजन सर, सचिव अकलीम तुराबी सर , सहसचिव विशाल अग्रवाल सर , खजिनदार. शैलेंद्र अग्रवाल सर,तसेच सदस्य सुधाकर पाटील सर , आर.जी.पाटील सर, मोहन पाटील सर, डॉ. प्रवीण चौधरी सर, सतीश पाटील सर, महेन्द्र पाटील सर , सुनील पाटील सर, ललित रामचंदानी सर ,तसेच शाळेचे व्यवस्थापक दिलीप वैद्य सर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.एम.आर.अकोले मॅडम (माध्यमिक विभाग) तसेच मुख्याध्यापक बी.एम.जोशी सर(प्राथमिक विभाग), पर्यवेक्षक अनिल पाटील सर, के. जी. विभाग प्रमुख सौ. वर्षा विवरेकर मॅडम सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वानी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम