मॉर्निंग वॉकदरम्यान डंपरची जोरदार धडक; महसूल कर्मचारी जागीच ठार

बातमी शेअर करा...

मॉर्निंग वॉकदरम्यान डंपरची जोरदार धडक; महसूल कर्मचारी जागीच ठार

एरंडोल – राष्ट्रीय महामार्गावर सकाळच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात धरणगाव तहसील कार्यालयातील लिपिक आणि एरंडोल येथील रहिवासी शिवाजी रघुनाथ महाजन (वय ४२) यांचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. ही घटना २० नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे ६.४५ वाजता बैठक हॉलसमोरच्या सर्व्हिस रोडवर घडली. या घटनेने एरंडोल व धरणगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

शिवाजी महाजन हे दररोजप्रमाणे सकाळी ओळखीच्या लोकांसह एरंडोल–पारोळा महामार्गावर मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. शहराच्या दिशेने परत येत असताना एचआर–३८ एडी–४१३६ या क्रमांकाच्या भरधाव डंपरने मागून जोरदार धडक दिली. धडकेत महाजन डंपरच्या चाकाखाली सापडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपर चालक वाहन सोडून फरार झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी राजेश पाटील, अमोल भोसले, विजय पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. डंपर जप्त करण्यात आला असून एरंडोल ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, पाच वर्षांचा मुलगा आणि अकरा वर्षांची मुलगी असा परिवार आहे.

अपघातातील डंपर एरंडोल–धरणगाव रस्त्याच्या कामासाठी मुरुम वाहतूक करत असल्याची माहिती आहे. महामार्ग प्राधिकरणाच्या हलगर्जीपणामुळे या मार्गावर वारंवार निष्पापांचे प्राण जात असल्याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला.

या प्रकरणी सुरेश लक्ष्मण पारखे यांच्या फिर्यादीवरून डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल किरण पाटील करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम