मोटारसायकलवरून गांजा वाहतूक करणारे दोन जण मोहाडी पोलिसांच्या जाळ्यात

बातमी शेअर करा...

मोटारसायकलवरून गांजा वाहतूक करणारे दोन जण मोहाडी पोलिसांच्या जाळ्यात

नाकाबंदी दरम्यान पोलिसांची मोठी कारवाई – 66,686 रुपयांचा गांजा आणि मोटारसायकल जप्त

धुळे प्रतिनिधी

जिल्ह्यात मोहाडी पोलिसांनी 7 मार्च 2025 रोजी रात्री 10 वाजता नाकाबंदी दरम्यान मोठी कारवाई करत दोन संशयितांना अटक केली. मोटारसायकलवरून गांजा वाहतूक करणाऱ्या या दोघांकडून 66,686 रुपये किमतीचा 6.686 किलो गांजा आणि 50,000 रुपये किंमतीची मोटारसायकल असा एकूण 1,16,686 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईत पोलिसांनी जयराम सरप्या पावरा (रा. निंबारी, ता. शिरपूर, जि. धुळे) आणि नाश्या जायन्या पावरा (रा. गोवाडी, ता. नेवाली, जि. बडवाणी, मध्यप्रदेश) यांना अटक केली. त्यांच्यावर एन.डी.पी.एस. कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

या संपूर्ण कारवाईत पोलीस निरीक्षक शशिकांत श्रीराम पाटील यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने उत्कृष्ट कामगिरी बजावली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम