
मोटारसायकल चोरी करणाऱ्या एकाला अटक
मोटारसायकल चोरी करणाऱ्या एकाला अटक
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी
जळगाव – शहरात वाढत चाललेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनांवर अंकुश आणण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या विशेष सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेने कारवाईचा वेग वाढवला असून त्यामध्ये चार मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणत एक आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने माजिदअली लियाकत अली (रा. उस्मानिया पार्क, शिवाजीनगर) याला दि. ६ डिसेंबर रोजी ताब्यात घेतले. गॅरेज मेकॅनिक म्हणून काम करणारा माजिदअली बऱ्याच दिवसांपासून दोनचाकी चोरी करत असल्याची खात्री पटली. चौकशीदरम्यान त्याने जिल्हापेठ पोलीस स्टेशन हद्दीतून विविध ठिकाणांहून एकूण ४ मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.
त्यात दि. ०४/०४/२०२५ रोजी धुळे सायकल मार्टजवळून सरताज कलीम मणियार यांची HF Deluxe (MH 19 DK 1176), दि. २९/११/२०२५ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून प्रशांत बडगुजर यांची HF Deluxe (MH 19 CE 4899), दि. २३/११/२०२५ रोजी त्याच ठिकाणावरून मनोजकुमार सैनी यांची Splendor Plus (MH 19 BC 8497) तसेच आणखी एक मोटारसायकल अशा चार वाहनांचा समावेश आहे. यापैकी तीन मोटारसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.
आरोपीला पुढील तपासासाठी जिल्हापेठ पोलीस स्टेशनकडे सुपूर्द करण्यात आले असून पोना प्रदीप पाटील पुढील तपास करीत आहेत. माजिदअली यापूर्वी मोटारसायकल दुरुस्तीचे काम करत असल्याने वाहनांच्या तांत्रिक बाबींचे ज्ञान वापरून तो चोरी करीत होता, असे चौकशीतून समोर आले आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी केली. या कारवाईत पोउपनि शरद बागल, सफी/अतुल वंजारी, पोहेको/अक्रम शेख, विजय पाटील, पोना/किशोर पाटील, पोकों/राहुल रगडे, रविंद्र कापडणे तसेच नेत्रममधील पोकों मुबारक देशमुख आणि सावदा पोलीस स्टेशनचे श्रे.पोउपनि बशीर तडवी यांनी सक्रिय सहभाग घेतला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम