मोटार सुरु करताना विजेचा धक्का लागून शिपाई गंभीर जखमी

बातमी शेअर करा...

अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील मेहेरगाव येथे पाणीपुरवठ्यासाठी मोटर सुरू करताना ग्रामपंचायतीचे शिपाई प्रफुल्ल श्रीधर पाटील (वय ३८) यांना विजेचा तीव्र धक्का बसून ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना तातडीने अमळनेर येथील नर्मदा फाउंडेशन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पाटील हे घरातील एकमेव कमावते सदस्य असल्याने त्यांच्या जखमी झाल्याने कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेकडून तत्काळ पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली. यावेळी विभागीय सचिव सुभाष पाटील, तालुकाध्यक्ष नरेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

संघटनेच्या वतीने शासन, ग्रामपंचायत तसेच गावातील दानशूर व्यक्तींनी उपचारासाठी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम