मोठे वाघोदा येथे ३ लाखाचा ऐवज लपास

सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा...

मोठे वाघोदा येथे ३ लाखाचा ऐवज लपास

सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सावदा (प्रतिनिधी) – सावदा येथून जवळ असलेल्या मोठे वाघोदा येथील यशवंत नगर मधील रहिवासी सुनील वामन मानकरे हे दि. २५/३/२५ रोजी बहिणी कडे खामणी येथे द्वारदर्शणा साठी गेले होते दाराचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला मानकरे घाई गर्दी मध्ये त्यांनी कपाटाची चाबी कपाटालाच राहिल्याने चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरात चहा बनवून पिला मागील दाराचे कुलुप तोडून पसार झाले.

घरातील किराणा सामान देखील लपास केला आहे २५गॅम सोने, चांदी, व हरबरा विकून आलेले २०हजार रोख, असा अंदाजे ३लाख रूपये चा ऐवज लपास केला आहे त्या मुळे परिसरात घबराट पसरली आहे.मानकरे हे खामणी म. प्र.येथे रात्री उशिर झाल्याने ते तेथे मुक्कामी राहिले ते दि. २६रोजी सायंकाळी घरी परत आल्यावर चोरीचा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी सावदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या परिसरात आणखी २ ठिकाणी घराचे कुलुपे तोडली आहे तरी पोलीस नी रात्री ची ग्रंस्त वाढवावी अशी मागणी आहे दरम्यान सावदा शहरात देखील मागील काही दिवसात भुरट्या चोऱ्या वाढल्या आहेत, मोटार सायकली चोरीस गेल्या आहेत वाढत्या चोऱ्या बघता सावदा शहरात विशेषतः शहराचे बाहेरील भाग सोमेश्वर नगर, सुगंगा नगर, नवीन वाढीव वस्ती आदी ठिकाणी रात्रीची गस्त वाढविणे गरजेचे असल्याचे नागरिकांत बोलले जात असून याकडे सावदा पोलिसांनी दखल घेऊन लक्ष देणे आवश्यक आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम