
मोठ्याने डीजे वाजविल्याने डीजे चालकावर गुन्हा दाखल
रावेर प्रतिनिधी
ध्वनी प्रदुशन केल्यामुळे अमळनेर येथील डी जे चालकावर रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की रावेर पोलीस ठाणे अंतर्गत भोकरी (ता. रावेर) येथे अमळनेर येथील श्री. म्युझिकल बॅण्ड हे शासनाने दिलेल्या नियमापेक्षा जास्त तिव्रतेने मोठ्या आवाजात गाणी वाजवीत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळाली. पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन यांनी ध्वनी मोजणीसाठी लागणारी मोजणी यंत्र db (A) Leq द्वारे पंचनामा करुन आवाजीची तिव्रता मोजली. ती नियमा पेक्षा जास्त भरल्याने डीजेची आयशर क्रमांक एम एच १२ एन एक्स ४५६० चे बॅण्ड चालक अजय संजय बोरसे रा. शिरुड (ता. अंमळनेर) यांच्यावर ध्वनी प्रदूषण कायद्याचा भंग केलेने त्यांचेवर पर्यावरण संरक्षण कायदा सन 1986 व ध्वनी प्रदूषण (विनियमन व नियंत्रण) अधिनियम 2000 मधील तरतुदींच्या अनुषंगाने कारवाई करण्यात आली असुन सदर कार्यवाही कामी मा. प्राधिकृत अधिकारी सो, ध्वनी मापन विभाग, जळगांव यांच्या कडे अहवाल पाठविण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. श्री. महेश्वर रेड्डी,अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते,भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन, पोलीस नाईक पुरुषोत्तम पाटील, पोकॉ नितीन सपकाळे, या पथकाने कार्यवाही केली आहे.
ध्वनी प्रदूषण संदर्भात डी जे बॅण्ड मालक यांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार व वेळेत बॅण्ड वाजवावा अन्यथा कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. असे आवाहन रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांनी केले आहे .

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम