
मोबाईल न दिल्याच्या रागातून तरुणाची आत्महत्या
मोबाईल न दिल्याच्या रागातून तरुणाची आत्महत्या
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील ममुराबाद येथे पालकांनी मोबाईल घेऊन न दिल्याच्या रागातून ऋषीकेश विजय न्हावी (वय २३) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी, २२ ऑगस्ट रोजी रात्री नऊ ते दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
ऋषीकेश हा मिळेल ते मोलमजुरी करून कुटुंबाला हातभार लावत होता. गेल्या काही दिवसांपासून तो नवीन मोबाईल घेऊन देण्याचा हट्ट धरत होता; मात्र आर्थिक परिस्थितीमुळे पालकांनी नकार दिल्याने तो नाराज झाला होता. शुक्रवारी पुन्हा वाद झाल्यानंतर तो गच्चीवर जाऊन झोक्याच्या बंगळीला दोरीने गळफास घेतल्याचे उघड झाले. काही वेळाने आईने पाहिले असता मुलाने आत्महत्या केल्याचे समोर आले व घरात एकच आक्रोश झाला.
ग्रामस्थांच्या मदतीने त्याला तातडीने जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनेमुळे ममुराबाद गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ प्रकाश चिंचोरे करीत आहेत

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम