मोरगाव खुर्दमध्ये इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

बातमी शेअर करा...

मोरगाव खुर्दमध्ये इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव (प्रतिनिधी) : रावेर तालुक्यातील मोरगाव खुर्द येथे राहत्या घरात गळफास घेऊन दिलीप मधुकर पाटील (वय ४४) यांनी आत्महत्या केली. ही घटना नुकतीच घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी त्यांना तातडीने रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम