मोरफळ येथे तरुणाचा विहिरीत पडल्याने मृत्यू
डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले
बातमीदार l गुरुवार दि. २९ फेब्रुवारी २०२४
पारोळा : गुरांना रात्री पाणी पाजण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विहिरीत पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली.
तालुक्यातील मोरफळ येथील लक्ष्मण दादाभाऊ माळी (वय २४) हा तरुण २७ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास आपल्या शेतात असलेल्या गुरांना पाणी पाजण्यासाठी गेला होता. बराच वेळेपर्यंत तो घरी न परतल्याने नातेवाईकांनी शेताकडे धाव घेतली.
या वेळी विहिरीवर पंप सुरु होता, तर लक्ष्मण माळी हा पाय घसरून विहिरीत पडल्याचे निदर्शनास आले. ग्रामस्थांनी तत्काळ लक्ष्मण माळी यांना बाहेर काढून पारोळा कुटीर रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
याबाबत दिलीप माळी यांनी दिलेल्या खबरीवरून आज अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम