मोहन कुलकर्णी यांच्याकडून शिवकृपा हॉस्पिटलला व्हेंटिलेटर भेट
गरजूंवर मोफत उपचार करण्याचे डॉ राठोड यांना केले आवाहन
मोहन कुलकर्णी यांच्याकडून शिवकृपा हॉस्पिटलला व्हेंटिलेटर भेट
गरजूंवर मोफत उपचार करण्याचे डॉ राठोड यांना केले आवाहन
अंबरनाथ l प्रतिनिधी
येथील जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मोहन कुलकर्णी यांनी कोरोना च्या महामारीत काळात अंबरनाथ येथील नगरपालिका दवाखान्याला कर्ज काढून व्हेंटिलेटर मशीन दान दिले होते.
नगरपालिकेने सदर मशीन त्यांना परत दिल्याने त्यांनी सदर मशीन पुन्हा शिवकृपा हॉस्पिटलला दान देण्याचे ठरविले आणि शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत दान दिले.
या बाबत सविस्तर वृत्त असे कि, अंबरनाथ शहरातील जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दानशूर मोहन कुलकर्णी यांनी कोरोना च्या महामारीत काळात
अंबरनाथ येथील नगरपालिका दवाखान्याला स्वतः कर्ज काढून व्हेंटिलेटर मशीन दान दिले होते. जेणे करून गोर गरीब नागरिकांचे प्राण वाचावे या प्रामाणिक उद्देशाने दान दिले होते.
मात्र कोरोना ची महामारी संपल्याने नगरपालिकेच्या नियमानुसार नगरपालिकेने सदर व्हेंटिलेटर मशीन त्यांना सुपूर्द केले. त्यावेळी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा केली.
तसेच सदर व्हेंटिलेटर मशीन अंबरनाथ वासीयांचे प्राण वाचविण्यासाठी नेहमी कसे उपयोगात येईल याचा विचार मोहन कुलकर्णी सतत करत होते.
आणि सहकाऱ्यांशी चर्चेअंती सदर मशीन डॉ गणेश राठोड यांच्या शिवकृपा हॉस्पिटल अँड मॅटर्निटी होम यांना दान देण्याचे ठरविले आणि शहरातील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत दान दिले.
या वेळी त्यांनी डॉ गणेश राठोड यांना एकच अपेक्षा व्यक्त केली व आवाहन केले की, गरीब व गरजू रुग्णाला मोफत उपचार करावेत असे सांगितले. आणि डॉ राठोड हे निश्चितच त्यांच्या अपेक्षा पूर्ण करतील याची त्यांना खात्री आहे.
सदर व्हेंटिलेटर मशीन देणगी देतांना शहरातील ज्येष्ठ नागरीक, रोटरियन्स, आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत माजी नगराध्यक्ष सुनील भाऊ चौधरी, अंबर भरारी अध्यक्ष डॉ गणेश राठोड यांना सुपूर्द करण्यात आले.
यावेळी अप्पा कुलकर्णी भाजपा शहर अध्यक्ष, अभय सोमन हेरंभ अध्यक्ष, देवेन्द्र ओक, डॉ अरुणा राठोड, सुधाकर जाधव, अमर राणे, शरद दलाल, किशोर जोशी, सौ कांचन मिश्रा, सौ ममता त्रिपाठी अनेक नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम