
मोहरद येथील १७ वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्याने मृत्यू
मोहरद येथील १७ वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्याने मृत्यू
अडावद (ता. चोपडा) : तालुक्यातील मोहरद गावात घडलेल्या दुर्दैवी घटनेत कामरान आमद तडवी (वय १७) या तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. १ नोव्हेंबर रोजी सकाळी बकऱ्या चारण्यासाठी घरातून बाहेर पडलेला कामरान दुपारी बराच वेळ घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. दुपारी सुमारास तो घराच्या मागील बाजूस असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या परिसरातील तारेच्या कुंपणात अडकलेल्या अवस्थेत आढळून आला. तपासात समोर आले की, त्या कुंपणावर वीज प्रवाहित झाल्यामुळे कामरानला विजेचा धक्का बसला व त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात असून, रात्री उशिरा त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अडावद पोलीस ठाण्यात आमद मोहम्मद तडवी यांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम