मोहाडी जिल्हा रुग्णालयात दुर्बिणीद्वारे दोन गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी

बातमी शेअर करा...

मोहाडी जिल्हा रुग्णालयात दुर्बिणीद्वारे दोन गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी

जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हा महिला व बाल रुग्णालय, मोहाडी येथे ९ जुलै रोजी दोन अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे यशस्वीरीत्या करण्यात आल्या. या शस्त्रक्रियांचे नेतृत्व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील (सामान्य रुग्णालय, जळगाव) आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण सोनवणे (महिला व बाल रुग्णालय, मोहाडी) यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.

पहिल्या शस्त्रक्रियेत, रुग्णाची गर्भपिशवी पूर्णतः काढण्यात आली. या रुग्णाचे यापूर्वी दोन सिझेरियन ऑपरेशन्स झाले होते आणि त्यामुळे गर्भपिशवी मूत्रपिंड व इतर अवयवांशी चिकटलेली होती. अशा अत्यंत जोखमीच्या परिस्थितीतही ही शस्त्रक्रिया डॉ. रोहन पाटील व डॉ. चंदन महाजन यांनी कौशल्यपूर्वक व यशस्वीरित्या पार पाडली.

दुसऱ्या शस्त्रक्रियेत, गर्भाशयाजवळील ९ बाय ७ सेंमी आकाराची गाठ, जी आजूबाजूच्या अवयवांना चिकटलेली होती, तीही यशस्वीरित्या काढण्यात आली. ही शस्त्रक्रिया डॉ. रोहन पाटील यांनी केली.

या दोन्ही शस्त्रक्रियांदरम्यान भूल देण्याचे काम डॉ. नरेंद्र ठाकूर, डॉ. सुनील तायडे आणि डॉ. किरण सोनवणे यांनी अतिशय दक्षतेने पार पाडले. अधिसेविका संगीता शिंगारे, परिसेविका वैशाली पाटील, अधिपरिचारीका तुळसा माळी व नम्रता नागापुरे यांच्यासह शस्त्रक्रिया विभागातील कक्षसेवक आणि इतर सर्व सहकाऱ्यांनीही शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम