मोहाडी येथे रामनवमी उत्सव उत्साहात साजरा

वृक्षवल्ली फाउंडेशनच्या संत ज्ञानेश्वर भजनी मंडळाचा उपक्रम

बातमी शेअर करा...

मोहाडी येथे रामनवमी उत्सव उत्साहात साजरा

वृक्षवल्ली फाउंडेशनच्या संत ज्ञानेश्वर भजनी मंडळाचा उपक्रम

मोहाडी (ता. मोहाडी, जि. जळगाव) प्रतिनिधी

वृक्षवल्ली फाउंडेशन संचलित संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ, मोहाडी यांच्या वतीने रामनवमी उत्सव मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावात साजरा करण्यात आला. या धार्मिक कार्यक्रमाला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून रामभक्तीचा जयघोष केला.

या भक्तिपूर्ण सोहळ्यात निवृत्ती दादा सपकाळे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने भाविकांसाठी विशेष भोजन व्यवस्था करण्यात आली होती, ज्याचा सर्वांनी लाभ घेतला.

कार्यक्रमात हार्मोनियम वादक दिनकर दादा धर्मे व नाल वादक सचिन चौधरी यांच्या मनोहारी वादनाने वातावरण मंत्रमुग्ध झाले. त्याचबरोबर आनंद मिस्त्री, ज्ञानेश्वर सपकाळे, शरद सोनवणे, विलास सोनवणे, भरत दादा गवळी, दिलीप मराठे, रवींद्र सोनवणे, सीधा आप्पा गवळी, बाबुलाल राठोड, नथू भाऊ चव्हाण, भुरा भाऊ राठोड, लक्ष्मण गवळी, अभिमान बाविस्कर, रवींद्र कोळी, कृष्णा गायकवाड, रामचंद्र कोळी, पांडुरंग गवळी आदींच्या उपस्थितीने कार्यक्रम अधिकच गौरवशाली झाला.

कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ मोहाडी यांच्या पुढाकाराने पार पडले. समस्त भजनी मंडळाचे योगदान उल्लेखनीय होते. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि नामस्मरणाच्या गोड ध्वनीत हा उत्सव भक्तिरसात न्हालेल्या वातावरणात पार पडला.

 

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम