
म्हसावद येथे मध्यरात्री घरफोडी ; चोरट्यांनी ऐवज लांबवला
म्हसावद येथे मध्यरात्री घरफोडी ; चोरट्यांनी ऐवज लांबवला
जळगाव – तालुक्यातील म्हसावद येथे मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घरफोडी करून विवेक किशोर चव्हाण (वय ३४, रा. अर्जुन आप्पा नगर, म्हसावद रेल्वे स्टेशन) यांच्या घरातून सोने, चांदीचे दागिने व रोकड असा एकूण ५६ हजार ५०० रुपयांचा ऐवज लांबवला. ही घटना दि. १९ ते दि. २० ऑगस्ट रोजी दरम्यान घडली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवेक चव्हाण यांचा टेन्ट हाऊसचा व्यवसाय आहे. दि. १९ च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातून चांदीचे देव व मूर्ती, सोन्याची अंगठी, मेडल तसेच रोकड असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता चव्हाण यांनी घरातील अस्ताव्यस्त स्थिती पाहून चोरी झाल्याचे लक्षात आले.
त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम