
म्हसावद-विटनेर-बोरनार शिवारात सोलर केबल चोरी
म्हसावद-विटनेर-बोरनार शिवारात सोलर केबल चोरी
जळगाव प्रतिनिधी तालुक्यातील म्हसावद, विटनेर व बोरनार शिवारातील शेतांमध्ये बसवलेल्या सोलर प्लान्टमधून ८० हजार रुपये किंमतीची डीसी केबल चोरट्यांनी लांबवली. ही घटना १७ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून १८ सप्टेंबरच्या सकाळी उघडकीस आली.
याबाबत प्रवीण सुभाष शिंदे (वय ४०, रा. बाहेरपुरा, ता. पाचोरा) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा तपास पोहेकॉ ईश्वर लोखंडे करत आहेत. या चोरीमुळे परिसरातील शेतकरी व सोलर प्लान्ट मालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम