
यावल एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयास जिल्हाधिकाऱ्यांची भेट
यावल एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयास जिल्हाधिकाऱ्यांची भेट
राज्यस्तरीय योजनांच्या अंमलबजावणीचा घेतला आढावा
जळगाव,प्रतिनिधी – जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आज एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय, यावल येथे भेट देऊन आश्रमशाळा, प्रशासकीय कामकाज, विविध शासन योजना, आर्थिक प्रगती व प्रलंबित नोंदींची सविस्तर पाहणी केली. अधिकाऱ्यांशी संवाद साधून आवश्यक सूचना दिल्या.
यानंतर आदिवासी विकास विभागाचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दूरदृश्य प्रणाली द्वारे आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकल्प कार्यालयातून सहभाग घेतला. आश्रमशाळांच्या सुविधा, बांधकाम कामे, निधी वापर, कर्मचारी व्यवस्थापन तसेच धरती आबा जनजातीय गौरव वर्ष उपक्रमांच्या प्रगतीची समीक्षा करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी ग्राम व तालुका विकास आराखडे तातडीने तयार करून जिल्हास्तरीय आराखड्याची कार्यवाही गतीमान करण्याचे निर्देश दिले.
तसेच संविधान अमृत महोत्सवानिमित्त एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व संविधान प्रस्तावनेचे अनावरण करण्यात आले. या भेटीत प्रकल्प अधिकारी अरुण पवार, तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र ठाकूर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निशिकांत गवई उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम