यावल नगरपालीका निवडणुक पार्श्वभुमीवर ५०पेक्षा अधिक गुन्हेगारांवर कॉम्बींग ऑपरेशनद्वारे कारवाई 

बातमी शेअर करा...

यावल नगरपालीका निवडणुक पार्श्वभुमीवर ५०पेक्षा अधिक गुन्हेगारांवर कॉम्बींग ऑपरेशनद्वारे कारवाई 
यावल तालुका प्रतिनिधी तालुक्यातील फैजपूर पोलीस उपविभागातील यावल ,फैजपूर, रावेर, येथे होत असलेल्या सार्वत्रिक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रक्रिया शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी फैजपूर विभागाच्या पोलीस उपधीक्षक कार्यालय अंतर्गत यावल पोलीस स्टेशन हद्दीतील यावल शहरासह दहिगाव, साकळी ,डांभुर्णी, किनगाव, अट्रावल, निमगाव ,अंजाळे येथे पोलीस पथकाने आज रात्रीच्या सुमारास कोंबिंग ऑपरेशन करत विविध गुन्ह्यातील ५५ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांचे आदेशान्वये तालुक्यातील फैजपूर येथील पोलीस उपअधीक्षक कार्यालयांतर्गत उपविभागीय पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर तसेच यावल पोलीस स्टेशन ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे व सहकाऱ्यांनी तालुक्यातील यावल शहरासह दहिगाव ,साकळी ,डांभुर्णी ,किनगाव ,अट्रावल, निमगाव ,अंजाळे येथे कोंबिंग ऑपरेशन करत जामीनपात्र वॉरंटमधील १०,अजामीनपात्र वॉरंट ६,समन्स बजावणी १४, हिस्टरी सीटर ५, शारीरिक इजा पो चविणारे २१, दारूबंदी ९ व हद्दपार आरोपी ४ असे ५५ गुन्हेगार पथकाने तपासत त्यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे ,निवडणूक प्रक्रिया निर्भीड, भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांनी प्रसिद्धी पत्रकांवर केले आहे

 

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम