यावल बसस्थानकात पोलीस चौकी उभारणार – आमदार अमोल जावळे

यावल बसस्थानकात परिवर्तन फाउंडेशनतर्फे उपक्रम

बातमी शेअर करा...

यावल बसस्थानकात पोलीस चौकी उभारणार – आमदार अमोल जावळे

यावल बसस्थानकात परिवर्तन फाउंडेशनतर्फे उपक्रम

यावल | प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब जयंती दिनी यावल बस स्टॅन्ड मध्ये परिवर्तन फाउंडेशन यावल यांचे संस्थापक युवराज सोनवणे यांच्यातर्फे पोलीस चौकी उभारण्याचे आश्वासित करण्यात आल्यामुळे या जागेची भूमिपूजन फीत कापून आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या हस्ते या ठिकाणी नारळ वाहून पूजा करण्यात आली याप्रसंगीपरिवर्तन फाउंडेशन चे संस्थापक युवराज सोनवणे यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला याप्रसंगी यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक डी बी महाजनभाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे भूषण फेगडे संजू फिरके पाटील माजी नगरसेवक रवी भिल्ल कैलास पाटीलआणि एसटी आगाराचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावल बस स्टॅन्ड मध्ये मोठ्या प्रमाणावर या वर्षात पाकीटमारांचा धुमाकूळ तसेच महिलांची दागिने चोरणे असे प्रकार वाढल्यामुळे परिवर्तन फाउंडेशन ने पु ढाकार घेऊनया ठिकाणी दोन पोलीस कर्मचारी असतील असे लोखंडी प्लेटच्या आठ बाय सहा आकाराची पोलीस चौकी देण्याची जाहीर केल्यामुळे या फाउंडेशनचे आमदार अमोल जावळे यांनी आभार व्यक्त केले. तसेच एसटी आगार प्रमुख डी बी महाजन यांनीया ठिकाणी पोलीस प्रशासनातर्फे जर कायमस्वरूपी एक महिला वपुरुष पोलीस कर्मचारीनियुक्ती केली तर निश्चितच अशा चोरट्यांना आळा बसेल. याव ल एसटी आगारातर्फे पोलीस स्टेशनला नेहमी या संदर्भात पत्र व्यवहार करण्यात आला असल्याची आमदार महोदया समोर सांगितले येत्या आठ दिवसातया ठिकाणी पोलीस चौकी तयार करून आमदार साहेबांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येईल असे परिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक युवराज सोनवणे यांनी सांगितले यावेळी एसटी आगारात तर्फे या फाउंडेशनचे अध्यक्ष युवराज सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आमदार अमोल जावडे यांनी अशा दानशूर दातृत्व असलेल्या फाउंडेशनच्या मार्फत जर प्रशासनाला सहकार्य केले तर निश्चितच प्रशासनामध्ये सुसूत्रता येईल व विकृत घटनांना व चोरट्यांना लगाम बसेल असे छोट्या एखादी समारंभात सांगितले

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम