
यावल बालक अत्याचार-हत्या प्रकरणात आरोपीच्या काकालाही अटक
यावल बालक अत्याचार-हत्या प्रकरणात आरोपीच्या काकालाही अटक
यावल (प्रतिनिधी) : शहरातील बाबूजीपुरा भागात ५ वर्षीय बालकावर लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आलेल्या भीषण प्रकरणात आरोपीला मदत केल्याप्रकरणी त्याच्या काकालाही पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे या गुन्ह्यातील संशयितांची संख्या आता दोन झाली आहे.
मुख्य आरोपी शेख शाहिद शेख बिस्मिल्ला न्हावी (वय २२) न्यायालयीन कोठडीत असून, त्याच्या काकाला सोमवारी न्यायालयाने ३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदर बालक ५ सप्टेंबर रोजी बेपत्ता झाला होता. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह आरोपीच्या घरात आढळून आला. आरोपीने बालकावर लैंगिक अत्याचार करून गळा आवळून हत्या केली व मृतदेह जाळून पोत्यात लपवला होता. या घटनेची माहिती स्वतः आरोपीच्या वडिलांनी पोलिसांना दिल्याने प्रकरण उघडकीस आले होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम