युवाशक्ती फाऊंडेशन व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या वतीने बाप्पाच्या महाआरती वेळी चित्तथरारक प्रात्यक्षिके ७९० रोपांचे आज होणार वाटप

बातमी शेअर करा...

युवाशक्ती फाऊंडेशन व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या वतीने बाप्पाच्या महाआरती वेळी चित्तथरारक प्रात्यक्षिके ७९० रोपांचे आज होणार वाटप

जळगाव दि. ५ प्रतिनिधी – भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मागील १७ वर्षांपासून काव्यरत्नावली चौक येथे आदर्श गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. मंडळातर्फे ७९० रोपांच्या सहाय्याने बल्लाळेश्वर गणपतीची प्रतीकृती देखावा म्हणून सादर करण्यात आली आहे. वृक्षसंवर्धन करुन पर्यावरणाचा संदेश यातून दिला गेला. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जनाच्या दिवशी शनिवार दि. ६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजेपासून रोपांचे वाटप नागरिकांना करण्यात येईल. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या रोपांचा स्वीकार करून पर्यावरण जतन करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

दरम्यान बुधवार दि. ३ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७.३० वा मंडळातर्फे महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, दिप्ती कराळे, जिल्हाधिकारी आयुषप्रसाद, जैन इरिगेशन सिस्टम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन, ज्योती जैन, सार्वजनिक गणेश महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे, अपूर्वा नारळे, ललित चौधरी, युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक विराज कावडीया, अनिल जोशी, राजेश नाईक, लेफ्टनंट शिवराज पाटील, मृणालिनी चित्ते, जितो लेडीज विंगच्या अध्यक्षा डॉ. सोनाली जैन, शितल जैन, नरेंद्र भोई, दिलीप पाटील, प्रितम शिंदे, संदिप सुर्यवंशी, पियुष हसवाल, दिक्षांत जाधव, सागर सोनवणे यावेळी उपस्थित होते.

विविध प्रात्यक्षिकांनी वेधले नागरिकांचे लक्ष –

नुतन मराठा महाविद्यालयातील विद्यार्थिनी कल्याणी महाजन हिने तलवारबाजी सह इतर चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. महाबली ढोल पथकातील १२८ वादकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. चित्तथरारक रोप मल्लखांबचेही प्रात्यक्षिके नरेंद्र भोई यांच्या मार्गदर्शनात युवतींनी सादर केले

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम