युवासेना तर्फे शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात
युवासेना तर्फे शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात
एम जे कॉलेज येथे सदस्य नोंदणी अभियानाला प्रारंभ
जळगाव- शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे २३ जानेवारी २०२५ रोजी मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे.
या अभियानाअंतर्गत जळगाव शहरातील मुळजी जेठा महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर युवासेना कॉलेज कक्ष तर्फे शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. याचे उदघाटन शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे व युवासेना उत्तर महाराष्ट्राचे विभागीय सचिव विराज कावडीया यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. या वेळी युवासेना कॉलेज कक्ष युवाधिकारी प्रीतम शिंदे, शिवसेना उप-महानगरप्रमख किरण भावसार, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख उमेश चौधरी, युवासेना कॉलेज कक्षाचे अजय खैरनार, योगेश कोळी, सौरभ बाविस्कर, राजदीप पाटील आदी उपस्थित होते.
सदर शिवसेना सदस्य नोंदणी अभियान युवासेना कॉलेज कक्षतर्फे जळगाव शहरातील प्रत्येक महाविद्यालयात राबविण्यात येणार असल्याचे युवासेना कॉलेज कक्षाचे युवा अधिकारी प्रीतम शिंदे यांनी कळविले आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम