युवासेना – शिवसेना तफे विनामुल्य सीईटी महासराव परीक्षा

जळगाव जिल्ह्यातील ३१२८ विद्यार्थी देणार सीईटी सराव परीक्षा

बातमी शेअर करा...

युवासेना – शिवसेना तफे विनामुल्य सीईटी महासराव परीक्षा

जळगाव जिल्ह्यातील ३१२८ विद्यार्थी देणार सीईटी सराव परीक्षा

जळगाव – सलग ५ व्या वर्षी महाराष्ट्र राज्यातील सर्व 288 विधानसभेत शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात व शिवसेना तथा युवासेना सचिव आमदार वरूण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अकरावी, बारावी व पदवीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत सीईटी सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. युवासेना आयोजित महासराव परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्यातील २४३१५ विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली असून जळगाव जिल्ह्यातून सर्वाधिक ३१२८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

या अनुषंगाने जळगाव शहरासह जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी युवासेना – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे शनिवार दि. 29 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 1.00 वाजेदरम्यान अकरावी, बारावी व पदवीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत सीईटी सराव परीक्षा घेण्यात येणार आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील २६२८ विद्यार्थी सीईटी सराव परीक्षेत सहभागी होणार आहेत. यासाठी त्यांनी ऑनलाईन नाव नोंदणी सुद्धा केली आहे.
यामध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधी, फार्मसी विभागाच्या कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सदर सराव परीक्षा जळगाव शहरातील जी. एच. रायसोनी महाविद्यालय, शिरसोली रोड व महावीर क्लासेस, गणेश कॉलनी या केंद्रांवर ऑफलाईन स्वरूपात आज शनिवार दि. 29 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 1.00 वाजेदरम्यान घेण्यात येणार आहे.
जास्तीतजास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी युवासेना उत्तर महाराष्ट्राचे विभागीय सचिव विराज कावडीया (मो. 9422222699) व युवासेना कॉलेज कक्ष युवाधिकारी प्रितम शिंदे (मो. 9405446632) यांना संपर्क साधावे असे आवाहन युवासेनेतर्फे करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम