युवासेनेची राज्य कार्यकारिणीची बैठक शिवसेना भवन मुंबई येथे उत्साहात

जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित

बातमी शेअर करा...

युवासेनेची राज्य कार्यकारिणीची बैठक शिवसेना भवन मुंबई येथे उत्साहात

जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित

मुंबई प्रतिनिधी

शिवसेना भवन, दादर, मुंबई येथे रविवार दिनांक 16 मार्च 2025 रोजी शिवसेना तथा युवासेना सचिव .आमदार.वरुण सरदेसाई यांच्या मुख्य उपस्थितीत शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली.

या बैठकीला जळगावहून युवासेना उत्तर महाराष्ट्राचे (नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार) विभागीय सचिव विराज कावडीया, युवासेना जिल्हा युवाधिकारी निलेश चौधरी, पियुष गांधी, युवासेना कॉलेज कक्ष जळगाव लोकसभा युवाधिकारी प्रीतम शिंदे, उपजिल्हायुवाधिकारी विशाल वाणी, महानगर युवाधिकारी संदीप सूर्यवंशी, शहर युवाधिकारी अजय खैरनार उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम