
युवासेनेतर्फे सलग ५व्या वर्षी जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन
युवासेनेतर्फे सलग ५व्या वर्षी जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन
जिल्ह्यातील 9 मुलांचे तर 5 मुलींचे संघ होणार सहभागी
जळगाव प्रतिनिधी I शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेतर्फे शुक्रवार, दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी जी.एच.रायसोनी महाविद्यालय, जळगाव येथे सलग पाचव्या वर्षी जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने कुमार गट जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातून कुमार वयोगटातील 9 मुलांचे तसेच 5 मुलींचे संघ असे 168 खेळाडू सहभागी होणार आहेत.
स्पर्धेचे तांत्रिक आयोजन जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव जितेंद्र शिंदे व सहकारी यांच्या मार्गदर्शनात होणार आहे.
तरी जळगावकर नागरिकांनी सदर स्पर्धेला उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहित करावे असे आवाहन युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया व प्रितम शिंदे यांनी केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम