युवा शक्तीने देश घडविला — प्राचार्य वाय. व्ही. पाटील

'रोल फॉर युथ इन नेशन बिल्डिंग' या विषयावर किसान रासेयोत राष्ट्रीय सेमिनार

बातमी शेअर करा...

युवा शक्तीने देश घडविला — प्राचार्य वाय. व्ही. पाटील

‘रोल फॉर युथ इन नेशन बिल्डिंग’ या विषयावर किसान रासेयोत राष्ट्रीय सेमिनार

पारोळा — किसान कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने ‘रोल फॉर युथ इन नेशन बिल्डिंग’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय सेमिनारचे आयोजन केले. या कार्यक्रमात युवकांच्या देश विकासातील महत्त्वाच्या भूमिकेवर भर देण्यात आला.

मुख्य वक्ते सुमन कुमार यादव, युथ ऑफिसर, राष्ट्रीय सेवा योजना विभाग (महाराष्ट्र व गोवा) यांनी युवकांच्या सशक्तीकरणावर भाष्य केले. “युवकांमध्ये अपार शक्ती असून, ती देशसेवेसाठी वापरावी. शिवाजी महाराज यांच्यापासून प्रेरणा घ्या,” असा संदेश त्यांनी दिला.

संचालक सचिन नांद्रे यांनी युवकांना देशाचे भविष्य म्हटले आणि त्यांच्या क्रांतिकारक भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले. हरियाणाहून आलेल्या डॉ. हर्विंदर कौर यांनी युवकांची रचनात्मक ऊर्जा आणि स्वच्छ चरित्र देशनिर्मितीसाठी अनिवार्य असल्याचे सांगितले. “२०४७ मध्ये भारताच्या प्रगतीसाठी ही ऊर्जा महत्त्वाची ठरेल,” असे त्यांनी नमूद केले.

डॉ. संजय शींगाने यांनी एनएसएस आणि युवकांच्या जडणघडणीवर मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय. व्ही. पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात युवकांच्या दिशेने देशाचा प्रवास कसा ठरतो यावर भर दिला. “स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरही देशाच्या जडणघडणीत युवकांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे,” असे ते म्हणाले.

या सेमिनारमध्ये भारतभरातून २६३ सदस्यांनी सहभाग घेतला. यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, स्वयंसेवक, शिक्षक आणि विद्यार्थी यांचा समावेश होता. ऑफलाइन स्वरूपात ७० स्वयंसेवकांनीही आपली उपस्थिती नोंदवली.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आयक्यूएसी समन्वयक डॉ. दीपक साळुंखे, डॉ. ए. एस. पाटील, डॉ. पी. एस. ठाकरे, श्री. एन. एन. वळवी, डॉ. एस. बी. पाटील, डॉ. ए. जी. पाटील, श्री. प्रशांत इंगोले, डॉ. आर. एस. माळी, डॉ. पी. पी. पाटील, डॉ. चंद्रकांत सातपुते, श्री. प्रमोद चौधरी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. उपप्राचार्य डॉ. जी. एच. सोनवणे यांनी सेमिनारचे नियोजन आणि मार्गदर्शन केले. महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. अनिता मुडावदकर यांनी प्रास्ताविक केले तर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकाऱ्यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील, अजय शिंदे (क्षेत्रीय संचालक, राष्ट्रीय सेवा योजना विभाग), रोहन सतीश पाटील, संचालक रेखा सतीश पाटील आणि वर्षा रोहन पाटील यांनी महाविद्यालय आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे अभिनंदन केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम