यूपीमध्ये’ नो हेल्मेट-नो पेट्रोल’ धोरण लागू होणार
राज्यात दरवर्षी २५,०००-२६,००० लोकांचा मृत्यू
लखनौ
उत्तर प्रदेशात वाढते दुचाकींचे अपघात रोखण्यासाठी राज्य सरकार लवकरच ‘नो हेल्मेट-नो पेट्रोल’ धोरण लागू करण्याच्या तयारीत आहे. सर्वच जिल्ह्यांमध्ये हे धोरण अंमलात आणण्याचा सरकारचा मानस आहे.
पेट्रोलपंपधारकांनी दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेट नसल्यास पेट्रोल देऊ नये, असे निर्देश राज्याचे वाहतूक आयुक्त ब्रजेश नारायण सिंह यांनी गेल्या ८ जानेवारी रोजी दिले आहेत. याबाबतचे पत्र राज्यातील सर्व ७५ जिल्हयांच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना पाठवण्यात आले आहे
. हेल्मेट परिधान केले नसल्यामुळे दुचाकीस्वार अपघाताचे शिकार होत आहेत. रस्ते अपघातांमुळे राज्यात दरवर्षी २५,०००-२६,००० लोकांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे जीव वाचवणे व अपघात रोखण्यासाठी ‘नो हेल्मेट-नो पेट्रोल’ लागू करणार असल्याचे सिंह यांनी स्पष्ट केले आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम