येत्या पंधरा दिवसात रस्त्याचे काम न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय फोडून टाकणार

प्रा.भाऊसाहेब सोनवणे यांचा गंभीर इशारा

बातमी शेअर करा...

येत्या पंधरा दिवसात रस्त्याचे काम न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय फोडून टाकणार

प्रा.भाऊसाहेब सोनवणे यांचा गंभीर इशारा

जळगाव प्रतिनिधी कानळदा भोकर जिल्हा परिषद गटामध्ये अनोखे आंदोलन केले गेले या आंदोलन मध्ये प्रामुख्याने शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख शेतकरी पुत्र प्रा.भाऊसाहेब सोनवणे, शिवसेना तालुका प्रमुख प्रमोदभाऊ घुगे यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन रस्त्यावरच्या पाण्यातील गड्यात बसून केले गेले.

नंदगाव,फेसर्डी,पिलखेडा,नांद्रा बुद्रुक या नऊ किलोमीटरच्या रस्त्यामध्ये भ्रष्ट ठेकेदाराने काम न करता पैसे खाल्ले याच्या निषेधार्थ आज रस्त्यावरच्या गड्यात पाण्यात होळी सोडून अनोखा निषेध व्यक्त केला गेला.हे आंदोलन पिलखेडा ते फेसर्डी रस्ता दरम्यान टोल काट्या जवळ करण्यात आले. या वेळी पंचक्रोशीतील शेतकरी यांनी सत्ताधारी यांच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करून परिसर दणाणून सोडला.

या आंदोलनामध्ये भगवान भाऊ धनगर,प्रभाकर कोळी,धनराज वारडे,सुनील सोनवणे,शैलेशभाऊ चौधरी,राजू नवाल,आतिश चौधरी,देवासपकाळे,गोपाल जाधव,विजय सोनवणे,शांताराम पाटील,लोटन सोनवणे तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम