येमेनमध्ये पेट्रोलपंपावर स्फोट, १५ जणांचा मृत्यू

४० जखमींची प्रकृती गंभीर

बातमी शेअर करा...

येमेनमध्ये पेट्रोलपंपावर स्फोट, १५ जणांचा मृत्यू
४० जखमींची प्रकृती गंभीर
सना I वृत्तसंस्था
येमेनमध्ये रविवारी एका पेट्रोलपंपावर शक्तिशाली स्फोट होऊन भीषण आग लागल्याचा प्रकार घडला आहे. यात, किमान १५ जणांचा मृत्यू झाला असून, ६७ जण जखमी झाले आहेत.

यापैकी ४० जखमींची प्रकृती गंभीर आहे, असे स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. हौथी बंडखोरांचे प्राबल्य असलेल्या बायदा भागातील पेट्रोलपंपावर स्फोट झाला आहे.

मात्र, यामागील कारण लगेचच कळू शकलेले नाही. परंतु, आगीमध्ये पेट्रोलपंप जळून खाक झाला आहे. घटनास्थळी हवेत आगीचे व धुराचे मोठमोठे लोळ उठले होते.

या आगडोंबात परिसरातील असंख्य वाहने भस्म झाली आहेत. त्यामुळे तिथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांमध्ये एकच दहशत पसरली होती, असे सूत्रांनी सांगितले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम