रमजान ईदपूर्वी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन जमा करण्याची मागणी

हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनची शासनाकडे विनंती

बातमी शेअर करा...

रमजान ईदपूर्वी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन जमा करण्याची मागणी

– हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनची शासनाकडे विनंती
– २० ते २२ मार्च दरम्यान वेतन बँक खात्यात जमा करण्याची मागणी

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन रमजान ईदपूर्वी जमा करावे, अशी मागणी हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्य प्रवक्ता शेख अब्दुल रहीम यांनी केली आहे.

 

यासंदर्भात राज्याचे शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, शिक्षण आयुक्त, तसेच शिक्षण संचालक (प्राथमिक व माध्यमिक) यांना निवेदन देण्यात आले आहे.

ईदसाठी वेतन वेळेवर मिळावे

सध्या मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू असून, ३० किंवा ३१ मार्च २०२५ रोजी रमजान ईद साजरी होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावे, जेणेकरून ते सण आनंदाने साजरा करू शकतील, अशी मागणी करण्यात आली आहे.

वेतन प्रक्रिया गतिमान करण्याची मागणी

सामान्यतः मार्च महिन्याचे वेतन १ एप्रिलनंतर जमा होते, मात्र यावेळी कामाचे कारण न देता वेतन प्रक्रिया गतिमान करून २० ते २२ मार्च दरम्यान वेतन जमा करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी शासनाने तातडीने वेतन निधी उपलब्ध करून संबंधित विभागांना निर्देश द्यावेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

शासनाकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा

राज्यातील मुस्लिम समाजातील शिक्षकांनी रमजान ईद आनंदाने साजरी करावी यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनने व्यक्त केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम