
राख चोरीप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
राख चोरीप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
वरणगाव, ता. भुसावळ : सुसरी शिवारातील शेत गट नंबर ४४ हर्षदा किशोर धांडे यांचे शेतात औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर येथून विकत घेतलेली राख तीन जणांनी चोरी केली. ही घटना दि. २८ मे रोजी रात्री ते दि. २९ मे रोजी सकाळी ७ च्या दरम्यान घडली. याप्रकरणी वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. अमनप्रित जैसविंदरसिंग सनसोय (वय ३६, रा. निंभोरा बु) त्रिमुर्ती हॉटेलजवळ दीपनगर (ता. भुसावळ) यांनी सुसरी शिवारातील शेत गटनंबर ४४ हर्षदा किशोर धांडे यांचे शेतात औष्णीक विद्युत केद्र दीपनगर येथून विकत घेतलेली ९०० टन राख पैकी ८९० टन राख साठवून ठेवली होती. संशयीत आरोपी अवनुरसिंग गुरविंदसिंग चहाल, गुरविदसिंग इंदसिंग चहाल (दोघ रा. चहाल पंजाबी ढाबा, ता. भुसावळ), चेतन पाटील (पुर्ण नाव माहीत नाही, रा. सुसरी, ता. भुसावळ) यांनी अमनप्रित जैसविंदरसिंग सनसोय यांचे संमतीविना लबाडीच्या इराद्याने राख चोरी केली आहे. म्हणून तिघांविरुध्द वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. दीपनगर परिसरात राख चोरीच्या घटना अलीकडच्या काळात वाढल्यात आहेत. त्यामुळे अधिकृत राख घेणाऱ्या व्यक्तींचे नुकसान होत आहे. सपोनि जनार्दन खंडेराव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार श्रावण जवरे तपास करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम