
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त तीनशे विद्यार्थ्यांना शालेय पुस्तक वह्या वाटप
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त तीनशे विद्यार्थ्यांना शालेय पुस्तक वह्या वाटप
जळगाव प्रतिनिधी l आज दिनांक 31 मे 2025 रोजी कविरा ग्रुप तर्फे तांबापुरातील तीनशे गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तक वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संतोष पाटील शिवसेना महानगरप्रमुख यांच्या हस्ते वाटप करण्यात आले .तसेच कविरा ग्रुप तर्फे मोफत लायब्ररीमध्ये गतवर्षी वीस मुलांची विविध ठिकाणी सरकारी विभागांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांची व पालकांची सत्कार करण्यात आले.
कविरा ग्रुपचे अध्यक्ष अॅड सचिन हटकर यांच्याकडून धनगर समाजात *सामूहिक विवाह* सोहळा व *मोफत लायब्ररी* व शिक्षणाविषयी सामाजिक धोरण व सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन शिक्षणाचा प्रसार केला जातो आणि धनगर समाज आर्थिक दृष्ट्या व सामाजिक दृष्ट्या परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतात ,या कार्यक्रमाला उपस्थित सामाजिक बांधव शिवाजी कोपनर ,दीपक काळनोर, विनोद शिंदे,जिभाउ कोपनर,अशोक कोपनर,नाना पिसे ,राहुल माने, दादाभाई सुरंगे ,गोपाल लकडे ,जितू चोरमले ,आकाश मासाळ, नाना हटकर, विशाल सरक, मुकेश हटकर, ऋषी काळनोर, प्रवीण चोरमले ,विनोद हटकर, सागर चोरमले ,सोपान हटकर ,तुषार पाटील, अॅड योगेश पाटील,ॲड दिपक वाघ,ॲड अजय पाटील,श्रीकांत पाटील व कविरा ग्रुपचे विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम