
राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने जगदिश महाजन सन्मानित
राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने जगदिश महाजन सन्मानित
सत्रासेनता. चोपडा, जि. जळगाव ;- रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन, दापोली यांच्या वतीने सन २०२५ साठीचा महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार धनाजी नाना प्राथमिक आश्रमशाळा, सत्रासेन येथील मुख्याध्यापक जगदिश सिताराम महाजन यांना प्रदान करण्यात आला.
त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि नवोन्मेषी कार्याची दखल घेऊन पुणे येथे झालेल्या भव्य समारंभात हा सन्मान देण्यात आला. या वेळी राज्यभरातील मान्यवर, अधिकारी व शिक्षक उपस्थित होते.
महाजन हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असून, शाळेतील वातावरण प्रेरणादायी बनविण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावला असून पालकांचा सहभाग वाढला आहे.
या यशानिमित्त धनाजी नाना चौधरी आदिवासी सेवा मंडळ, यावल प्रकल्प अधिकारी, शिक्षकवर्ग व ग्रामस्थांनी महाजन यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
महाजन यांचा हा सन्मान संपूर्ण संस्थेचा आणि आदिवासी विकास विभागाचा अभिमान ठरला असून त्यांच्या कार्यातून भावी पिढीला प्रेरणा मिळेल, असे सर्वांनी नमूद केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम