
राज्यस्तरीय ग्रामविकास परिषदेत रामा पाटील थारकर यांचा सन्मान
उत्कृष्ट सहकार्याबद्दल विशेष सन्मान प्रदान
राज्यस्तरीय ग्रामविकास परिषदेत रामा पाटील थारकर यांचा सन्मान
उत्कृष्ट सहकार्याबद्दल विशेष सन्मान प्रदान
शेगाव प्रतिनिधी
फाउंडेशनतर्फे आयोजित राज्यस्तरीय ग्रामविकास परिषदेत शिवसेना शेगाव तालुका प्रमुख रामा पाटील थारकर यांना केस गळती प्रकरणात शासनाला दिलेल्या उत्कृष्ट सहकार्याबद्दल विशेष सन्मान प्रदान करण्यात आला.
हा सन्मान आदर्श सरपंच पाटोदा, मा. भास्करराव फेरे पाटील (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) यांच्या हस्ते देण्यात आला. त्यांच्या कार्याची प्रशंसा करताना त्यांनी शासन व प्रशासनाला वेळोवेळी मदत करून समाजहिताचे कार्य करण्यासाठी त्यांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे मत व्यक्त केले.
या भव्य कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. आदर्श सरपंच भास्करराव करे पाटील, डॉ. हरीश साखरे (प्राचार्य), डॉ. पीएम शहापूरकर (प्राचार्य), डॉ. आर्यन गावित, तसेच पहाट फाउंडेशनचे पदाधिकारी यांनी आपली उपस्थिती नोंदवली.
तसेच शिवसेना शेगाव उपतालुकाप्रमुख मोहन पाटील लांजूडकर, बुलढाणा किसान सेना उपजिल्हाप्रमुख सरपंच सुमित डोसे पुंडे दस्तगावआणि इतर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजर होते..
सामाजिक कार्याचा गौरव
रामा पाटील थारकर यांनी केस गळती प्रकरणात शासनाला दिलेल्या मदतीमुळे जनतेला मोठा दिलासा मिळाला. त्यांच्या सहकार्यामुळे प्रशासनाला हे प्रकरण योग्य प्रकारे हाताळता आले आणि सामान्य नागरिकांना मदतीचा हात मिळाला. त्यांच्या सामाजिक बांधिलकीमुळे त्यांचे कार्य आदर्शवत ठरले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि विशेष आकर्षण
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती गावडे यांनी प्रभावीपणे केले. यावेळी ग्रामीण विकास, सामाजिक सहकार्य, पर्यावरण बदल आणि प्रशासनातील जनतेच्या सहभागावर विशेष चर्चा झाली.
सन्मानामुळे सामाजिक कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा
या सन्मानामुळे ग्रामीण भागातील सामाजिक कार्यकर्त्यांना नव्या उर्जेची प्रेरणा मिळेल आणि भविष्यातही समाजाच्या हितासाठी अशाच प्रकारे सहकार्य करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम