राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी जिल्हा संघ निवड चाचणी सुरू

तरुणांना सुवर्णसंधी

बातमी शेअर करा...

राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी जिल्हा संघ निवड चाचणी सुरू

तरुणांना सुवर्णसंधी

जळगाव : राज्यस्तरीय आंतर-जिल्हा २० वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धा ११ एप्रिलपासून लोणावळा येथे होत असून, जळगाव जिल्हा फुटबॉल संघाच्या निवड चाचणीला उत्साहात सुरुवात झाली आहे. मंगळवारी झालेल्या चाचणीसाठी जिल्ह्यातील ५३ युवा खेळाडूंनी सहभाग नोंदवला. यात जळगावसह भुसावळ, रावेर, चोपडा, अमळनेर आणि पारोळा येथील तरुण फुटबॉलपटूंचा समावेश होता.

युवांना संधी; सीआरएस नोंदणी आवश्यक

फुटबॉलपटूंना या स्पर्धेत संधी मिळावी म्हणून ज्या खेळाडूंनी अद्याप निवड चाचणीसाठी सीआरएस (C.R.S) नोंदणी केलेली नाही, त्यांना ३ आणि ४ एप्रिल रोजी नोंदणी करून निवड चाचणीत सहभागी होता येणार आहे. अंतिम संघ निवड ८ एप्रिलला होणार असून, १ एप्रिलपूर्वी नाव नोंदवू न शकलेल्या खेळाडूंसाठी संघटनेकडून ही शेवटची संधी देण्यात आली आहे.

संघटनेचे आवाहन

जळगाव जिल्ह्यातील युवा फुटबॉलपटूंनी या संधीचा लाभ घ्यावा आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, जळगाव येथे सकाळी ८ वाजता निवड चाचणीसाठी हजर राहावे, असे आवाहन जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव फारुक शेख यांनी केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम