
राज्यस्तरीय “सम्यक कार्यसम्राट” आदर्श शिक्षक पुरस्कार शेख अब्दुल रहीम यांना जाहीर!
राज्यस्तरीय “सम्यक कार्यसम्राट” आदर्श शिक्षक पुरस्कार शेख अब्दुल रहीम यांना जाहीर!
कागल, कोल्हापूर येथे होणार शेख अब्दुल रहीम सरांचा सन्मान!
औरंगाबाद : कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य प्रणित कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा, कोल्हापूरच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय “सम्यक कार्यसम्राट” आदर्श शिक्षक पुरस्कार हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सर यांना जाहीर झाला आहे. राज्यस्तरीय पुरस्कार निवड समितीच्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली आहे. नुकतीच नावे जाहीर केली आहे. यामध्ये निवड समितीने शेख अब्दुल रहीम सर यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन राज्यस्तरीय “सम्यक कार्यसम्राट” आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली आहे. हा पुरस्कार कोल्हापूर येथे महिला दिनानिमित आयोजित शिक्षक मेळावा आणि सन्मान सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरुप स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व पुष्पहार असे असेल. पुरस्कार स्विकारण्यासाठी शनिवार दि. 08 मार्च 2025 रोजी दुपारी 12.00 वा. श्रीराम मंगल कार्यालय, चिमगाव रोड, मुरगूड शिक्षक मंच, ता. कागल जिल्हा कोल्हापूर येथे सहपरिवार उपस्थित राहावे, असे आवाहन निवड पत्राद्वारे करण्यात आले. निवड पत्रावर कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेचे सरचिटणीस सतिष कांबळे सर यांची स्वाक्षरी आहे. शेख अब्दुल रहीम सर हे व्यवसायाने शिक्षक आहेत. ते हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशनद्वारे विद्यार्थी-शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील आहेत. विद्यार्थी-शिक्षकांसाठी वर्षभर अनेक उपक्रम राबवित असतात. कोणताही कार्यक्रमास पुष्पगुच्छ न देता पुस्तक भेट देणे या उपक्रमाचा गल्ली ते दिल्ली पर्यंतचा पायंडा त्यांनी पाडलेला आहे. पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन आणि शुभेच्छाचा वर्षाव होत आहे…

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम