राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथसंचलन शिबीरासाठी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या ४ विद्यार्थ्यांची निवड

निवड झालेल्या रासेयो स्वयंसेवकांचे अभिनंदन

बातमी शेअर करा...

राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथसंचलन शिबीरासाठी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या ४ विद्यार्थ्यांची निवड
निवड झालेल्या रासेयो स्वयंसेवकांचे अभिनंदन
जळगाव I प्रतिनिधी
मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथसंचलन शिबीरासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या ४ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

दि. २६ जानेवारी रोजी शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथसंचलन होणार आहे. युवा व क्रिडा मंत्रालय भारत सरकार, रासेयो प्रादेशिक संचालनालय, पुणे, रासेयो मंत्रालय कक्ष यांच्या निर्देशान्वये दि. १७ ते २६ जानेवारी या कालावधीत मुंबई येथे पथसंचलन शिबीर होणार आहे. या शिबिरासाठी विक्की लांडगे (आदर्श महाविद्यालय,निजामपूर जैताणे,जि.धुळे), निखिल सामुद्रे (जिजामाता महाविद्यालय, नंदुरबार), मनिषकुमार पाटील (काकासाहेब हिरालाल चौधरी महाविद्यालय, नंदुरबार) या तीन विद्यार्थ्यांची आणि हेमांगी मराठी (संगणकशास्त्र विभाग, कबचौउमवि,जळगाव) या विद्यार्थीनीची या पथसंचलन शिबिरासाठी निवड झाली आहे. निवड झालेल्या रासेयो स्वयंसेवकांचे कुलगुरू प्रा. व्ही.एल.माहेश्वरी, प्र-कुलगुरू एस.टी.इंगळे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, रासेयो संचालक डॉ.सचिन नांद्रे यांनी अभिनंदन केले आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम